राज्य सरकारला उद्देशून लिहिलेल्या पत्रातून गोवा पोलिसांनी राज्यात हा चित्रपट प्रदर्शित केला जावू नये अशी मागणी केली आहे. सध्याच्या घडीला होणारी प्रवाशांची गर्दी आणि एकंदर उत्साही माहोल पाहता ‘पद्मावत’ प्रदर्शित झाल्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली तर यामुळे राज्य पोलिस यंत्रणेवरील ताण वाढेल, हे कारण त्यांनी दिले आहे. गोवा पोलिसांनी केलेली ही मागणी पाहता, आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी गोव्यातील भाजपच्या महिला आघाडीनेही या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews