Lokmat Entertainment News | सुपरस्टार ब्रॅड पिट यांनी लावली बोली पण घडले हे । पहा हा विडिओ | Lokmat

Lokmat 2021-09-13

Views 0

चित्रपट व मालिकांच्या जाहिरातींसाठी अनेक सर्जनशील युक्त्या वापरल्या जातात. त्यात सर्वात लोकप्रिय व पारंपरिक पद्धत म्हणजे त्यातील कलाकारांना भेटण्याची संधी मिळवणे होय. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या लोकप्रिय मालिकेच्या निर्मात्यांनीदेखील याच युक्तीचा परंतु काहीशा वेगळ्या प्रकारे जाहिरातीसाठी वापर केला आहे. त्यांनी इतरांप्रमाणे कोणतीही स्पर्धा वगैरे आयोजित न करता थेट मालिकेतील कलारांचे लिलाव केले आहेत. या मालिकेतील लोकप्रिय कलाकारांचा लिलाव करण्यात आला आणि सर्वात जास्त बोली लावलेल्या व्यावसायिकांबरोबर हे कलाकार ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेचे आठवे सत्र पाहणार आहेत. या लिलावात हॉलीवूडमधील जेसन सेगल, लीना डनहॅम, अर्नोल्ड यांसारख्या अनेक श्रीमंत कलाकारांनी भाग घेतला होता, परंतु सुपरस्टार ब्रॅड पिट या लिलावातील विशेष आकर्षण ठरला. त्याने मालिकेतील मुख्य अभिनेत्री एमिलिया क्लार्कला जिंकण्यासाठी तब्बल १ लाख २० हजार अमेरिकी डॉलर्स खर्च करण्याची तयारी दर्शवली. पण त्याहीपेक्षा जास्त पैसे खर्च करून एका व्यवसायिकाने एमिलियाबरोबर ‘गेम ऑफ थ्रोन्स’ पाहण्याची संधी मिळवली. या संपूर्ण लिलावात १००० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त पैशांची उलाढाल झाली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS