आये हो देखने शहर हमारा दूरही रखना कचरा तुम्हारा.. सफाई को अपनाना है महाबळेश्वर स्वच्छ बनाना है या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश महाराष्ट्राचं मान असलेल्या महाबळेश्वरच्या भिंती-भिंतीवरून दिला जातोय. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत भिंतीवर विविध प्रकारे रंगरंगोटी, स्वच्छता संदेश आणि चित्रांद्वारे स्वच्छतेबरोबरचं पर्यावरण जनजागृती करण्यात आलीये.देशात स्वच्छतेसाठी अव्वल स्थान पटकवण्या साठी महाबळेश्वर नगरपरिषदेनं कंबर कसलीय. मुख्य बाजारपेठ दिवसातून पाच वेळा स्वच्छ केली जातेय. देशभरातून येणाऱ्या लाखो पर्यटकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केलं जातयं. प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या या मोहिमेचं पर्यटकांनी स्वागत केलंय.दरवर्षी १५ ते १६ लाख पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात. हजारो टन कचरा इथं जमा होतो. त्यामुळे स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.पण, आता स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून नागरिक, व्यापारी आणि पर्यटक यांच्या जागरुकता निर्माण झालीय.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews