पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश साकिब निसार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच चर्चेत आहे. हा व्हिडिओ निसार साहेबांनी ठोकलेल्या तडाकेबंद आणि तितक्याच वादग्रस्त भाषणाचा आहे. या व्हिडिओत न्यायमूर्ती निसार हे महिलांसंबंधी आक्षेपार्ह विधान करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर प्रचंड प्रमाणात टीका होताना दिसते आहे. न्यायमूर्ती साकिब निसार यांना एका कार्यक्रमात पाहूणे म्हणून बोलवले होते.ते बोलण्यासाठी माईकजवळ येत होते तेव्हा, त्याच्या हातात काही कागद होते. हातातील कागदांकडे निर्देश करत उपस्थितांना उद्देशून ते म्हणाले, 'आपण लोक हे कागद पाहून कदाचित कंटाळला असाल. पण, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी काही लांबलचक भाषण मुळीच नाही देणार. कारण, मला वाटते की, कोणतेही भाषण हे महिलेच्या स्कर्ट सारखे असावे. तो इतकाही लांब असू नये की पाहणाऱ्याला कंटाळा येईल. आणि तो इतकाही आखूड नको की, मुख्य भाग सुद्धा झाकला जाणार नाही.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews