गुजरातमधील विधानसभा निवडणुकांसाठी मोदी संपूर्ण राज्यात सभा घेत आहेत. मात्र गेल्या काही दिवसात त्यांच्या सभांचा कमी झालेला प्रेक्षकवर्ग चच्रेचा विषय होता. धांदुका, भरूच येथे तर अध्र्याहून अधिक खूच्र्या रिकाम्या राहिल्या होत्या. भाजपचे मुख्यमंत्री उभे असलेल्या राजकोटमध्येही 15 हजार खूच्र्याचे मैदान भरण्यासाठी माणसे आणण्याची वेळ आली होती. सूरतमधील रहिवाशांनी मात्र प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मोदींना दिलासा दिला. सूरतमधील लिंबायत परिसरात बुधवारी संध्याकाळी सहा वाजता मोदी यांची सभा होती. वादळामुळे ती रद्द करावी लागली. मात्र सूरतमध्ये एकतरी सभा हवीच, म्हणून आचारसंहिता संपण्याआधी घाईघाईने गुरुवारी दुपारी एक वाजता सभा ठेवली गेली. गुजराती, उत्तर भारतीय आणि मराठी कनिष्ठ वर्गीयांची मिश्र वस्ती असलेल्या या भागात गुजरातमधील एकमेव मराठी आमदार आहे. घरांनी वेढलेल्या मदानाला दुपारी एक वाजता जत्रेचे रूप आले होते. ज्या मदानात सभा होती, त्याच्या पलिकडच्या मोकळ्या जागेवर बस, ट्रक, टेम्पो, कार, दुचाकींचा वेढा पडला होता.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews