सामाजिक माध्यमांद्वारे महिलांना त्रास देण्याचे, त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारची अवमानकारक वक्तव्ये आणि टिप्पणी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. नोकरदार महिला, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि अगदी महिला लोकप्रतिनिधी यांच्याकडूनही यासंदर्भात महिला आयोगाला सातत्याने तक्रारी येत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्या साठी योग्य पावले उचलण्याची नितांत गरज निर्माण झाल्याचे आयोगाला वाटते. कारण अशा प्रकारच्या जाहीर अवमान कारक टिप्पणीचा त्या महिलेच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होण्याची भीती असते. म्हणून तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेल्या समितीकडून यासंदर्भात अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून तो राज्य सरकारला शक्य तितक्या लवकर सूपूर्द केला जाईल,’ असे रहाटकर यांनी सांगितले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews