उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील सेंट झेव्हीयर्स शाळेत एक हृदयद्रावक प्रकार घडला आहे. सुप्रीया ५ फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे शाळेमध्ये गेली होती. गृहपाठ न केल्याने शिक्षिका रजनी उपाध्याय यांनी सुप्रीयाला मारहाण केली. यामुळे ती बेशुद्ध पडली. सुप्रीयाला मऊ येथील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालायामध्ये तीचे सीटी स्कॅन करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी तिला ब्रेन हॅमरेज झाल्याचे सांगितले. यानंतर कुटुंबियांनी तिला वाराणसी च्या ट्रॉमा सेंटमध्ये दाखल केले मात्र तेथे उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews