नाशिक शहरातल्या सिडको परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दीड वर्षाच्या मुलाच्या नाकात हरभरा अडकल्याने श्वास कोंडला गेला. आणि त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सुजय बिजूटकर असे मृत मुलाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक शहराजवळील चंदगिरी या गावातील चार वर्षीय मुलीनं दहा रुपयाचे नाणे गिळल्याने मृत्यू झाला होता. शालिनी दत्तात्रय हंडगे असे या मृत मुलीचे नाव आहे. शालिनीला उपचारासाठी आडगाव मेडिकल कॉलेज इथं नेण्यात आले होते. मात्र उपचार यशस्वी न होऊ शकल्याने तिचा मृत्यू झालाय.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews