जोहान्सबर्गच्या वॉडरर्स मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये मैदानावर उतरला. मैदाना वरील प्रेक्षकही गुलाबी रंगाचे कपडे, गुलाबी झेंडे आणि गुलाबी टोप्या घालून आले होते. या गुलाबी सामन्यामागे ब्रेस्ट कॅन्सरप्रती महिलांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी हा उद्देश आहे.विशेष म्हणजे गुलाबी रंगाचे कपडे डीव्हीलिअर्सला लकी मानले जातात. २०१५मध्ये डीव्हीलिअर्सने गुलाबी कपड्यांमध्ये खेळताना वेस्ड इंडिजविरुद्ध फक्त ३१ चेंडूत शतकी खेळी करत वेगवान शतकाचा विक्रम केला होता. त्यामुळे शनिवारच्या सामन्यात डीव्हीलिअर्स भारतीय गोलंदाजांवर तुटून पडल्याचे दिसण्याची शक्यता आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews