टीव्ही क्वीन आणि निर्माती एकता कपूर उघडपणे कास्टिंग काऊचवर बोलली आहे. एकता म्हणाली ‘‘ॲक्टर्सदेखील काम मिळवण्यासाठी प्रोड्यूसर्स सोबत रिलेशनमध्ये असतात. इंडस्ट्रीमध्ये अनेक असे प्रोड्युसर्स आहेत, जे आपल्या पोझिशनचा गैरवापर करतात आणि लैंगिक शोषण करतात. पण, अनेक असे ॲक्टर्स असतात जे काम मिळवण्यासाठी स्वत:च रिलेशन ठेवतात. पण, याबाबत लोक बोलत नाहीत. या इंडस्ट्रीत दोन प्रकारचे लोक आहेत. नेहमी पॉवरफुल लोक छोट्या ॲक्टर्सचा फायदा घेतात, असे म्हटले जाते. पण, हे खरे नाही. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मंदिरा बेदी हिने एक खळबळजनक वक्तव्य केले होते. कास्टिंग काऊचमध्ये केवळ एकट्याचीच चूक नसते. दोघांची सहमती असल्या शिवाय असे घडूच शकत नाही.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews