पाकिस्तानच्या "हनी ट्रॅप'मध्ये अडकून हवाई दलातील गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा "आयएसआय'ला देणाऱ्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याला दिल्ली पोलिसांनी आज अटक केली. ग्रुप कॅप्टन अरुण मारवा असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. भारतीय हवाई दलाच्या गुप्तचर विभागाने सुमारे 10 दिवस चौकशी केल्यानंतर मारवा यांना विशेष शाखेच्या उत्तर विभागाकडे सोपविण्यात आले, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्यांना कायद्याखाली अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याचेही या अधिकाऱ्याने नमूद केले
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews