उत्तराखंडमधील काठघोडम मध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीशी स्विटीची फेसबुकवरुन ओळख झाली. आपण पुरुष असल्याचं स्विटीने तिला भासवलं. त्याच वर्षी दोघी विवाह बंधनात अडकल्या. नैनितालमधील हलदवणी गावात त्या भाड्याच्या घरात राहायला लागल्या. काही दिवसातच स्विटीने तिला हुंड्यासाठी मारहाण करायला सुरुवात केली.२०१६ मध्ये स्विटीने पुन्हा नैनितालमधल्याच २० वर्षीय तरुणीला जाळ्यात ओढलं. लग्न करुन आपल्या नव्या जोडीदारासह ती हरिद्वार मध्ये राहायला लागली. स्विटीने कुठल्याही तरुणीला आपल्या शरीरा जवळ येऊ दिलं नाही.स्विटीच्या पहिल्या पत्नीने काठघोडम पोलिसात ऑक्टोबर २०१७ मध्ये तक्रार दाखल केल्यावर हे प्रकरण उघडकीस आलं. हरिद्वार मध्ये फॅक्टरीसाठी स्विटीने आपल्या कुटुंबा कडून साडेआठ लाख रुपये घेतल्याचा आरोप पहिल्या पत्नीने केला.पोलिसांनी हुंडा आणि घरगुती अत्याचारा साठी स्विटीला अटक केली. मात्र ती महिला असल्याची पोलिसांना कल्पना नव्हती. चौकशीत तिने आपण महिला असल्याचं सांगितलं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews