दिल्ली ला वाढते प्रदूषण रोखण्याच्या हिशोबानी केरोसीन आणि डिजल वर चालणाऱ्या जेनेरेटर वर 17 ऑक्टोबर पासूनच बंदी घालण्यात आली होती..आता कार्तिकी एकादशी नंतर लग्नाचे मुहूर्त असतात त्यामुळे जास्त रोषणाई ची आवश्यकता असते अश्यात एनव्हॉरनमेंटल पोल्युशन कंट्रोल एजन्सी ने जेनरेटर च्या प्रयोग वर बंदी कायम ठेवली आहे..लग्नामध्ये रोषणाई करता डिजल व केरोसीन चा प्रयोग करून दिवे रोशन केले जातात ..वरातीत पण जेनेरेटर चा प्रयोग होतोच अश्या मधे ह्या निर्णयाचा लोकांना किती त्रास होईल हे सांगणे आता कठीण आहे .ह्या त्रासावर सरकार कडून LED लाईट चा वापर करा असे सांगण्यात आले आहे .पण इतके असून हि चोरी छुपे जेनेरेटर व्हॅन चा वापर सुरु असून लोक काही पैसे देऊन आपले काम करवून घेतात..
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews