रविवारी रस्ता निर्मितीच्या कामाच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या भारतीय सैन्यावर नक्षलवाद्यांनी जोरदार हल्ला केला. यामध्ये सैन्याचे दोन जवान जागीच शहीद झाले. तर इतर काहीजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी सैन्यानेही चोख प्रत्युत्तर देताना २० हून अधिक नक्षलींचा खात्मा केला.रविवारी नक्षलवाद्यांनी चिंतागुफा येथून सुरू असणारे रस्ता काम रोखण्यासाठी सुरुंग लावले. यावेळी नक्षलवाद्यांनी रस्ता निर्मिती करण्यासाठीच्या वाहनांची इंधन टाकी फोडून त्याला आग लावली. नक्षलवादी रस्ता निर्मिती रोखण्याच्या तयारीत आहेत तर सरकारनेही सैन्याच्या मदतीने रस्ता निर्मितीचे काम चालूच ठेवले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews