चीनमध्ये ट्रॅफिक ही प्रचंड मोठी समस्या आहे.यामधून मार्ग काढण्यासाठी आता एअर टॅक्सींचा शोध लागलाय.ई-हांग १८४' असं या टॅक्सींचं नाव आहे. सध्या या एअर टॅक्सीमधून एकच व्यक्ती प्रवास करू शकते. पूर्णपणे इलेक्ट्रिक असलेली ही टॅक्सी १५ किलोमीटरचा प्रवास एका टप्प्यात करु शकते.या टॅक्सीचा वेग ६० किलोमीटर इतका असणार आहे. या टॅक्सीत बसल्यावर फक्त ज्या ठिकाणी जायचं, ते ठिकाण निवडायचं.मग ती टॅक्सी आपोआप तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन पोहोचवते. चीनपाठोपाठ ही टॅक्सी अमेरिका आणि यूएईमध्ये लॉन्च केली जाणार आहे. जमिनीवर चालणाऱ्या, पाण्यात पोहणाऱ्या आणि हवेत उडणाऱ्या कार्स आतापर्यंत फक्त बॉन्डपटात किंवा रजनीकांतच्या सिनेमात दिसायच्या.पण आता त्या प्रत्यक्षात दिसणार आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews