Lokmat Latest News | तुमचं Sim Card लवकरच होईल निष्क्रिय | जाणून घ्या कारण | Aircel Shutdown | News

Lokmat 2021-09-13

Views 0

टेलिकॉम कंपनी एअरसेल दिवाळखोरीच्या स्थितीमध्ये आली आहे. कंपनीनं नॅशनल कंपनी ट्रिब्यूनलकडे दिवाळ खोरीसाठी अर्जही दाखल केला आहे. एअरसेल कंपनी बंद झाल्यावर त्यांच्या सगळ्या सर्कलच्या सेवाही बंद होणार आहेत. १५,५०० कोटी रुपये रिस्ट्रक्चर करण्यासाठी एअरसेल आणि मलेशियाची कंपनी मॅक्सिस मध्ये चर्चा सुरु होती. पण रिजर्व्ह बँकेनं रिस्ट्रक्चरींग वर बंदी घातल्यामुळे एअरसेलला हा निर्णय घ्यायला लागला. एअरसेल प्रत्येक महिन्याला ४०० कोटींची कमाई करते. यातले १०० कोटी रुपये एअरसेल ला दुसऱ्या कंपन्यांना टर्मिनेशन चार्ज म्हणून देते. तर २८० कोटी रुपये वेंडर आणि नेटवर्क अपटाईमसाठी खर्च करते. उरलेले पैसे लायसन्स फी, टॅक्स आणि इंटरेस्ट पेमेंटसाठी देते. एअरसेल बंद झाल्यानंतर ५ हजार कर्मचारीही अडचणीत सापडले आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS