औरंगाबाद --स्थानिक स्वराज संस्थांच्या औरंगाबाद-जालना विधान परिषद मतदारसंघात शिवसेना नेते आणि महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांचा विजय झाला. विशेष म्हणजे दानवेंना 524 मते मिळाली आहेत. त्यामुळे तब्बल 418 अधिकची मते घेऊन दानवेंनी आघाडीचे उमेदवार भवानीदास कुलकर्णी यांचा पराभव केला. आपल्या विजयानंतर अंबादास दानवेंनी आनंद व्यक्त करताना काँग्रेसला खोचक टोला लगावला. तसेच, काँग्रेसची मते आपल्याला मिळाल्याचंही मान्य केलं.
औरंगाबाद-जालना मतदारसंघातील विधान परिषेदच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले होते. त्यानंतर, आज सकाळी 8 वाजताच मतमोजणीला सुरुवात झाली. काही वेळातच अंबादास दानवेंच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळला. मतदानानंतरच कुठल्या पक्षाची किती मते फुटणार याची उत्सुकता मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्त्यांना लागली होती. अखेर, आजच्या निकालानंतर ही उत्सुकता संपुष्टात आली असून काँग्रेस, राष्ट्रवादीसह एआयएमआयमचीही मते फुटल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकांसाठी 657 पैकी 647 मतदान झाले होते. त्यापैकी दानवेंना 524 मते मिळाली असून आघाडीच्या कुलकर्णी यांना केवळ 106 मेत मिळाली आहेत. तर, अपक्ष उमेदवार शाहनवाज खान यांना फक्त 3 मते मिळाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मते फुटल्याचं स्पष्ट झालं आहे.
विजयानंतर माध्यमांशी बोलताना अंबादास दानवेंनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच, पक्षांच काम संघटनात्मक पातळीवर करत राहणं हे कार्यकर्त्याचं काम असतं. त्यानुसार मी काम करत होतो, योग्य वेळ येताच पक्ष दखल घेत असतो. उद्धव ठाकरेंनीही माझ्या कामाची दखल घेऊन मला उमेदवारी दिली. त्यामुळेच मी आमदार झाल्याचं दानवे म्हणाले. तसेच भाजपा-सेना महायुतीकडे एकूण 292 मते होती. मात्र, काँग्रेसची काही अदृश्य मते मिळाली. गुप्त मतदान हेच माझ्या विक्रमी मतांचे गणित आहे, असेही दानवेंनी म्हटलंय. तर, मी केवळ काँग्रेस म्हणतोय, असे म्हणत एमआयएमची मते फुटल्याच्या प्रश्नावर त्यांनी नकारात्मकता दर्शवली. विशेष म्हणजे महायुतीच्या मतांपेक्षा 126 अधिकची मते (फुटल्याची) दानवेंना मिळाली आहेत.
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #Aurangabad
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Down