कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसेप्रमुखराज ठाकरे हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. तसेच ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांना उपस्थित न राहण्यासाठी नोटीस बजाविल्या आहे. मनसे पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात आहेत. तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना देखील नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सरकारने महाराष्ट्रात दडपशाही सुरू केली आहे. राज साहेबांसोबत अनुचित प्रकार घडला तर सरकारला परिणाम भोगावे लागतील असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. मनसे वाहतूक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष आशिष डोके, मनसे ठाणे शहर सचिव रवींद्र सोनार, मनसे प्रभागध्यक्ष विनायक रणपिसे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #Thane
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19