शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोडून काढलं. यावरून भाजपा प्रवक्ते प्रविण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. पवारांच्या निष्ठेसाठी संजय राऊत शिवसेनेचं नुकसान करत आहेत, असं ते म्हणाले आहेत. याशिवाय शिवसेनेच्या शक्तीची काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी राऊतांना दिला आहे.
#SanjayRaut #PravinDarekar #AnantGeete #SharadPawar #ThackerayGovernent #Shivsena