एटापल्ली तालुक्यातील गट्टा-हेडरी मार्गावर पोलिस मदत केंद्रापासून हाकेच्या अंतरावर १५ किलो स्फोटकांचा साठा सापडला आहे. यामुळे मोठा अनर्थ टळला.शनिवारी सीआरपीएफ व जिल्हा पोलिस नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना गट्टा पोलिस मदत केंद्राच्या पश्चिमेस २ किलोमीटर अंतरावर जांभिया पुलाजवळ त्यांना संशयास्पद वस्तू आढळल्या त्यात एक वायरही होती. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब बॉम्बशोधक पथकाला कळवले. बॉम्बशोधक पथकाने ही स्फोटके बाहेर काढली. नंतर स्फोटके नष्ट करण्यात आली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews