डेव्हिड आणि व्हिक्टोरिया बेकहॅम या दाम्पत्याने अंतर्वस्त्र ठेवण्यासाठी आपल्या ६० लाख पौंडच्या कोट्सव्होल्ड्स येथील आलिशान फार्म हाऊसमध्ये एक वेगळी खोली तयार केली आहे. या नव्या खोलीसाठी बेकहॅम जोडप्याने तब्बल ६० हजार पौंड म्हणजेच जवळ पास ५१ लाख रुपये खर्च केले आहेत. याशिवाय व्हिक्टोरियाने आपल्या बेडरूमच्या डाव्या बाजूला डिझायनर कपड्यांसाठी एक वेगळी खोली तयार केली आहे. तसेच बुट आणि बॅग ठेवण्या साठीही वेगवेगळ्या खोल्या आहेत. बेडरूमच्या उजव्या बाजूला अंतर्वस्त्र आणि नाइटवेअर ठेवण्या साठी खास खोली तयार करण्यात आली आहे. तसेच या खोलीमध्ये जाण्यास मुलांना मनाई करण्यात आली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews