राजुरा (जि. चंद्रपूर) : बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होणार असून, शेतीच कायमस्वरूपी पर्याय ठरणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी बदलत्या काळानुसार पारंपरिक शेतीला फाटा देत वेगवेगळे प्रयोग करीत आहे. राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथील कवडु बोढे हे वेकोलितून सेवानिवृत्त झाल्यानंतर वडिलोपार्जित असलेल्या शेतीकडे वळले. त्यांच्या मदतीला मुलगा रवी बोढे हा युवक कृषीची पदवी शिक्षण घेऊन ग्रामसेवक झाला. नोकरीबरोबर व्यवसाय म्हणून पारंपरिक पीक न घेता सेंद्रिय पद्धतीने चक्क विदेशी ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. एकच वेळ खर्च आणि कमी जागेत उत्पन्न देणारे पीक म्हणून या फळाची ओळख आहे. विहीरगाव येथील कवडू बोढे व मुलगा रवीने ॲग्रोवन वर्तमान पत्रात शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहून पश्चिम महाराष्ट्रातील शेती बघून पारंपरिक शेतीला फाटा देत सेंद्रिय पद्धतीने चक्क विदेशी ड्रॅगन फ्रुटची लागवड केली.
(व्हिडिओ - श्रीकृष्ण गोरे व आनंद चलाख)