भोकरदन (जि. जालना) : तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहरातून वाहणाऱ्या केळणा नदीला मोठा पूर आला आहे. परिणामी भोकरदन शहरातून जाफ्राबादकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
त्यामुळे तालुक्यातील पारध, पिंपळगाव रेणुकाई, सिपोरा बाजार,भायडी, दानापूर या मोठ्या बाजारपेठेच्या गावांसह अनेक लहान मोठ्या गावांशी संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे सदरील रस्ता हा विदर्भातील अकोला, खामगाव, बुलढाण्याकडे जाणार मुख्य रस्ता असल्याने विदर्भाकडे जाणारी वाहतूक देखील ठप्प झाली आहे.
( व्हिडीओ: दीपक सोळंके)
#heavyrain #marathinews #sakal #maharahstra #jalna #rainupdate #esakal #sakalmedia #sakalnews