उमरगा (जि. उस्मानाबाद) : कोरोनाच्या स्थितीमुळे शाळा, महाविद्यालय बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब सुरु होता. कोरोना संसर्ग कमी झाल्याने सोमवारपासुन (ता. चार) ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी तर शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्याने शाळात विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू होता. कोरेगावची जिल्हा परिषद शाळा, उमरग्यातील महात्मा बसवेश्वर विद्यालय, शरणाप्पा मलंग विद्यालयात शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांची वैद्यकिय तपासणी करून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. ( व्हिडीओ : अविनाश काळे, उमरगा)
#osmanabad #schoolreopening #reopeningschools #openschools