#ambabai #shriambabai #salankrutpooja #kaumari
शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज करवीर निवासिनी 'श्री अंबाबाई'ची कौमारी मातृका रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. उत्सवात 'श्री अंबाबाई'च्या सप्तमातृका या संकल्पनेवर पूजा बांधल्या जात आहेत. कौमारी ही देवांचा सेनापती, युध्ददेवता कार्तिकेयाची शक्ती आहे. तिला कुमारी, कार्तिकी किंवा अंबिका म्हणूनही ओळखले जाते. ती मोरावर स्वार असून तिच्या हातात भाला, कुऱ्हाड, टाक आणि धनुष् असल्याची माहिती श्रीपूजक मयुर मुनीश्वर, सोहम मुनीश्वर आणि सुकृत मुनीश्वर यांनी दिली. यंदा उत्सवाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच उद्या (रविवारी) ललिता पंचमी असून यानिमित्ताने अंबाबाई टेंबलाईच्या भेटीसाठी जाणार असून टेंबलाई टेकडीवर कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी होणार आहे.
(बातमीदार - संभाजी गंडमाळे)
(व्हिडीओ - बी. डी. चेचर)