#amravati #amravatinews #krushikirtan #farmers #farmingrechnology #krushikirtan
तिवसा (जि. अमरावती) : दरवर्षी कपाशी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. दोन वर्षांपासून गुलाबी बोंडअळीने थैमान घातल्याने कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे. परंतु, गुलांबी बोंडअळी व कपाशीवरील इतर प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिसंस्था केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरच्या वतीने दरवर्षी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनाविषयी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. परंतु, यावर्षी हे मार्गदर्शन अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी येथील शेतकऱ्यांना चक्क कृषी किर्तन व भारुडाच्या माध्यमातून करण्यात आले. डॉ. शैलेश गावंडे यांनी कीर्तनकाराचा वेष परिधान करून शेतकऱ्यांना बोंडअळी व्यवस्थापण विषयीं जनजागृती केली. (व्हिडिओ - प्रशिक मकेश्वर)