‘फोर्ब्स'कडून ७ ऑक्टोबर २०२१ रोजी देशातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार देशातील पहिल्या १०० श्रीमंत भारतीयांची एकत्रित संपत्ती ७७५ अब्ज डॉलरच्या घरात जाणारी आहे. गेल्या वर्षात त्यांच्या संपत्तीत ५० टक्क्यांची म्हणजे २५७ अब्ज डॉलरची भर पडली. टाळेबंदीमुळे हजारो लोकांचे रोजगार बुडाले, तर बहुतांशांचे उत्पन्न घटले, मात्र याच काळात देशातील श्रीमंतांनी भरभराट अनुभवली. देशातील श्रीमंतांच्या यादीत कोणाचा समावेश?, जाणून घेऊया.