राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे नुकसान झालेले आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवरून स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अतिशय तोकडी आहे. मंत्र्यांची घरं भरण्यासाठी पिकविमा योजना आणली का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
#RavikantTupkar #Farmes #MaharashtraFloods #ThackerayGovernment
Swabhimani Sanghatana angry over the package announced by the government for the farmers affected by heavy rains