पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरून केंद्रसरकार ला खासदार अमोल कोल्हे यांनी धारेवर धरले. महागाई बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक अवाक्षर काढत नाहीत. १०० च्या पुढे पेट्रोलचे दर गेले आहेत. कोणाला शुभेच्या द्यायच्या झाल्यास पेट्रोल आणि डिझेल दरा पेक्षा तुझ्या आयुष्यात भरभराट जास्त होऊ दे अशा शुभेच्छा द्याव्या लागत असल्याचा मिश्किल टोला कोल्हे यांनी लगावला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.