शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात आले होते. सादर केलेला अर्थसंकल्प कसा आहे, असा प्रश्न यावेळी शिंदेंनी ठाणेकरांना विचारला. तर या अर्थसंकल्पातून विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचा चिमटाही त्यांनी काढला. दरम्यान अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांकडून यावर टीका टिप्पणी केली जात आहे.