#maharashtra #bjp #mla #mahavikasaaghadi #mva
महाविकास आघाडी सरकार च्या नाकर्तेपणामुळे गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना नुकसान होऊन देखील पिक विम्याची रक्कम मिळत नाही. अतीवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची वारसांना मदत मिळालेली नाही. याबरोबरच महसूल यंत्रणेच्या पर्जन्यमान मोजण्याच्या पद्धतीवरच आक्षेप नोंदवत पर्जन्य मोजण्याची पद्धत कुचकामी असून सरकार शेतकऱ्यांना मदत नाकारण्यासाठीच जाणीवपूर्वक वापरत असल्याचा आरोप चांदवड देवळाचे आमदार डॉ राहुल आहेर यांनी पत्रकार परिषदेत केला.(Report - भाऊसाहेब गोसावी)