कऱ्हाड : गॅस दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो, नरेंद्र मोदी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने कऱ्हाड (जि. सातारा) तहसील कार्यालयासमोर मंगळवारी गॅस परवडत नाही, असे सांगत चुलीवर चहा करुन तो फुकट वाटत अनोखे आंदोलन करण्यात आले. बळीराजा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, चंद्रकांत यादव, विश्वास जाधव, आनंदराव लादे, अविनाश फुके, सागर कांबळे, सुनिल कोळी, सुनिता लाडी, मंगल कचरे, कुसुम जाधव, सुभद्रा गायकवाड यांच्यासह महिला, कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (व्हिडिओ : हेमंत पवार)
#inflation #farmers agitation #narendra modi # bigupdate #esakal #sakalmedia