#mhaswad #shahilagna #mhaswadnews #siddhanathdevi #jogeshwaridevsthan
म्हसवड : येथील श्री सिद्धनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानचा पारंपरिक शाही विवाह सोहळ्याचा प्रारंभ काल दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर श्रींची घटस्थापनेने करण्यात आला. मंदिराचे सालकरी यांच्या कृष्णात गुरव यांनी सपत्निक प्रमुख उपस्थितीत ‘श्री’च्या मंदिरात घटस्थापना केली. त्यानंतर सकाळी ११ वाजता श्री सिद्धनाथ व देवी जोगेश्वरी देवस्थानच्या उत्सव मूर्तीस हळदी लावण्याचा कार्यक्रम सनई- चौघडा मंगल वाद्याच्या सुरात मंदिर गाभाऱ्यासमोरील हत्ती शिल्प मंडपात महिलांच्या उपस्थित झाला. ‘श्रीं’च्या शाही मंगल विवाह सोहळ्यानिमित्त मंदिर शिखर व परिसरात आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती. या शाही विवाह सोहळ्यासह दीपावली पाडव्यानिमित्त श्रींचे दर्शनासाठी भाविकांनी रांगेत व सुरक्षित अंतर ठेवीत श्रींच्या मूर्तीच्या दर्शनाचा लाभ घेतला. (व्हिडिओ : सल्लाउद्दीन चोपदार)