#satara #sataranews #sataraliveupdates #bankelections #udayanraje #udayanrajebhosale
सातारा : जिल्हा बँकेसाठी (Satara Bank Election 2021) खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) आणि सातारा तालुका विकास सेवा सोसायटीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांची बिनविरोध निवड झाली आहे. खासदार उदयनराजे यांनी गृहनिर्माणमधून अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात सभापती रामराजे समर्थक ज्ञानदेव पवार, दिलीप सिंह भोसले, उदयसिंह बरदाडे यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, अर्ज माघार घेण्याचा शेवटच्या दिवशी यांच्यासह अन्य उमेदवारांनी माघार घेतल्याने उदयनराजेंची बिनविरोध निवड झाली. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात विनय कडव आणि पांडुरंग देशमुख यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांनीही अर्ज काढून घेतल्याने शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही बिनविरोध निवडून आले आहेत. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)