दवाखान्यात दाखल होताना काय म्हणाले उद्धव ठाकरे? Uddhav Thackeray Hospitalized For Neck Pain Treatment
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून मानदुखी आणि पाठदुखीचा त्रास होतोय. हल्लीच मोदींसोबत एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे ऑनलाईन सहभागी झाले होते. तेव्हा उद्धव ठाकरे नेक बेल्ट लावून बसल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. आता याच मानदुखीवर उपचारासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणारेय. त्यासाठी दवाखान्यात अॅडमिट होताना त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला कळकळीचं आवाहन केलंय. पाहूयात काय म्हणालेत उद्धव ठाकरे...