#Satara #Bankelections #Sataranewsupdate #Maharashtra #esakal #sakalmediagroup
कराड : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवारी मतदान होत आहे त्या पार्श्वभूमीवर कराड सोसायटी गटातून राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात एडवोकेट उदयसिंह पाटील उंडाळकर निवडणूक रिंगणात आहेत या निवडणुकीत राज्याचे लक्ष लागून आहे या निवडणुकीत कराड तालुक्यातील कोणता गट कोणत्या उमेदवाराला सहकार्य करणार याबाबत मोठी उत्सुकता होती दरम्यान आज भोसले गटाचे डॉक्टर सुरेश भोसले भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले यांनी थेट सहकारमंत्र्यांच्या पेंडॉल मध्येच बसून ते सहकार मंत्र्यांबरोबर असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे भोसले गटाने सहकार मंत्र्यांना मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे.