Satara l मुसळधार पावसामुळं 40 शेळ्या-मेंढ्यांचा गारठून जागीच मृत्यू l Satara Rains l Sakal

Sakal 2021-12-02

Views 4

#SataraLiveUpdates #SataraRainUpdates #HeavyRainfallinSatara #MaharashtraRainUpdates #MarathiNews #Paus #esakal #SakalMediaGroup
खटाव (सातारा) : खटाव परिसरात बुधवारी रात्री अचानक हजेरी लावलेल्या पावसात हुसेनपूर शिवारात रामचंद्र चव्हाण या मेंढपाळाची पावसात गारठून ४० मेंढरं ठार झाल्याने संपूर्ण मेंढपाळाच्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणी (ता. खटाव ) येथील श्रीमंत शिंदे यांच्या हुसेनपूर येथील शेतात चव्हाण व त्यांच्या मावस भाऊ यांनी गेली सहा दिवस कराराने मेंढरे बसवली होती. काल अचानक रात्रीच्या वेळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मेंढरं सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यासाठी त्यांची तारांबळ उडाली. मात्र अंधार पडला असल्याने व चिखल झाल्याने त्यांना मर्यादा आल्या. परिणामी, ४० मेंढरे गारठून ठार झाली. (व्हिडिओ : राजेंद्र शिंदे)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS