ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या महापौरांच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी कोरोनामुळे नागरिकांना चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता आले नव्हते. कोरोनाचा धोका लक्षात मुंबई आणि आसपासच्या नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने दर्शन घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे असे आवाहनही महापौरांनी केले.