#Farmer #CentralGovernment #Strike #MaharashtraTimes
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गाझीपूर सीमेवर गेले एक वर्ष शेतकरी आंदोलनाला बसले होते. एक वर्ष केंद्र सरकारशी लढा दिल्यावर शेतकऱ्यांना यशाचं फळ चाखायला मिळालं. आणि केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतल्याचं संसदेत जाहीर केलं. त्यानंतर शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला आणि आता शेतकरी तब्बल एक वर्षांनी आपापल्या घरी जायला निघालेत