#PrajaktTanpure #ShivajiKardile #MaharashtraTimes
अहमदनगर जिल्ह्यातल्या मांजरसुभा इथं राज्यमंत्री प्राजक्त तानपूरे आले होते. यावेळेस त्यांनी जिल्ह्यातल्या विकासकामांचा आढावा घेतला. त्यासोबतच नव्या विकास कामांच्या भूमिपुजनाचाही शुभारंभ प्राजक्त तनपूरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळेस मांजरसुभा ग्रामपंचायतीच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या विकासकामांच्या जंत्रीबाबत बोलत असताना राज्यमंत्री प्राजक्त तानपूरे यांची जीभ अचानक घसरली. आणि त्यांनी थेट भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांची अक्कलच काढली. जनतेच्या मनात जाऊन बसायचं असेल तर जनतेची कामं करावी लागतात अशी खोचक टिप्पणी तानपूरे यांनी केली