#StWorkers #GunratnaSadavarte #BalasahebThorat #MaharashtraTimes
एसटी कर्मचारी विलनीकरांच्या मागणीवर ठाम असून आज वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अहमदनगर येथील एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. मंत्री बाळासाहेब थोरात मूग गिळून गप्प का? असा सवाल त्यांनी येथे बोलताना केला. मंत्री थोरात यांनी निधन झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना 50 लाखांच्या मदतीचा प्रस्ताव का पाठवला नाही. निधन झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या घरी थोरात यांनी साधी भेट दिली नाही. बाळासाहेब थोरात यांनी आमच्याशी नाही तर महाराष्ट्रातील ९५ टक्के लोकांशी पंगा घेतला आहे. असंं म्हणत मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी सडकून टीका केली.