#PetrolDieselRate #ModiGovernment #MaharashtraTimes
इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे. गेल्या वर्षभरात पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोल प्रोग्राम अंतर्गत इथेनॉलवरील जीएसटी दर 18% वरून 5% पर्यंत कमी केला आहे.दरम्यान, EBP प्रोग्राम अंतर्गत, इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जाते. पेट्रोलियम खात्याचे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.कच्च्या मालावर आधारित इथेनॉलचे दर निश्चित केले होते. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इथेनॉल खरेदीचे प्रमाणही वाढलं आहे.