बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना आणि अभिनेत्री वाणी कपूरचा ‘चंडीगढ़ करे आशिकी’ हा चित्रपट १० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. नेहमीप्रमाणेच या वेळी देखील आयुष्मान एक संदेश देणारा चित्रपट घेऊन आला आहे. समलैंगिक संबंध या विषयाला केंद्रस्थानी ठेवून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. अभिषेक कपूरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटात आयुष्मानने मनविंदर मुंजाल ऊर्फ तर वाणीने मानवी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. नुकतीच या चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला आयुष्मान खुराणा, वाणी कपूर यांच्यासह हृतिक रोशन, भूषण कुमार, प्रग्या जयस्वाल यांनी हजेरी लावली.