गोल्ड कॉमेडी अवॉर्ड्स २०२१ सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला छोट्या पडद्यावरील कलाकारांनी हजेरी लावली. लाफ्टर क्वीन भारती सिंह, 'तारक मेहता का उलटा चष्मा' मधील पोपटलाल, अभिनेता सुमित राघवन हे कलाकार या सोहळ्यास उपस्थित होते. गोल्ड कॉमेडी अवॉर्ड्स सोहळ्यात रेड कार्पेटवर छोट्या पडद्यावरील चमचमते सितारे अवतरताना दिसले.