छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा संतापजनक प्रकार सदाशिवनगर बंगळूर मध्ये काल घडल्यानंतर याचे पडसाद अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. पुण्यातला स्वारगेट एस टी स्टँड मध्ये शिवसेने ने या घटनेचा तीव्र निषेध करुन कर्नाटकला जाणाऱ्या बसेसला काळे फासले.