१७ डिसेंबर रोजी कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटायला लागले आहेत. कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले, तर बेळगाव शहरात १४४ कलाम लागू करण्यात आले आहेत. पुण्यात देखील शिवसैनिकांनी कर्नाटकात जाणाऱ्या बसेसवर काळा स्प्रे मारून निषेद नोंदवला. काल १८ डिसेंबर रोजी पंढरपूर आणि मुंबईमध्ये देखील अनेक शिवप्रेमी रस्त्यावर उतरले. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे फलक पेटवण्यात आले. कर्नाटक सरकारने छत्रपतींची विटंबना करणार्यांच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा कर्नाटक राज्याच्या गाड्या महाराष्ट्रात येऊ देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.