चंद्रपूर: नरभक्षक वाघ सिमेंट पाईपमध्ये अडकला | बघ्यांची तोबा गर्दी | रेस्क्यू टीम घटनास्थळी

Maharashtra Times 2021-12-23

Views 11

पोंभुर्णा तालुक्यात धूमाकूळ घालणाऱ्या वाघाने आज शेतात बकरीची शिकार केली. शिकारीवर ताव मारीत असतांनाच शेतकरी धावले. या लगबगीत वाघाने धूम ठोकली मात्र सिमेंटचा पाईपमध्ये वाघ अडकला. याची माहीती पसरताच शेकडो नागरिकांनी वाघाला बघण्यासाठी गर्दी केली. पोंभुर्णा-गोंडपिंपरी मार्गावरील चेक-आष्टा येथे झालेल्या गर्दीमुळे काही वेळासाठी वाहतुक ठप्प झाली. वनविभाग, पोलीस विभागाने घटनास्थळ गाठले. वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सूरू आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS