साक्री तालुक्यातील दहिवेल परिसरामध्ये अनेक दिवसांपासून थैमान घालणारा. बिबट्या पाण्याच्या शोधामध्ये विहिरीत पडल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या वेळी हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे. परिसरातील शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा या बिबट्याचे दर्शन देखील झाले होते. त्यामुळे वन विभागातर्फे या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आलेली होती.
परंतु वन विभागातर्फे या संदर्भात कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नव्हती. विहिरीत पडलेला बिबट्या विहिरीच्या बाहेर येण्यासाठी धडपड करीत होता.या बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.