#BeedRailway #HighSpeedRailway #MaharashtraTimes
हा जो आवाज तुम्ही ऐकला तो ऐकण्यासाठी बीडकरांचे कान कित्येक वर्षांपासून आसुसलेले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून नगर-बीड रेल्वेचं स्वप्न आता दृष्टीक्षेपात आलंय. कारण, येत्या २९ डिसेंबरला सोलापूरवाडी ते आष्टी या मार्गावर ट्रायल रन होणार असल्याचं रेल्वेने जाहिर केलंय. अहमदनगर ते आष्टी या ७० किलोमीटरच्या मार्गावर १०० च्या सुस्साट स्पीडने या रेल्वेची चाचणी घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे कित्येक वर्षांची प्रतिक्षा संपणार आहे.