#BhimthadiJatra #RuralCulture #MaharashtraTimes
मामाच्या गावाला जाऊया अशा आशयाचं एक गीत लहान थोर साऱ्यांच्याच परिचयाचं....रोजच्या धकाधकीच्या जीवनातुन कुठेतरी विरंगुला मिळावा म्हणून गावाला जाय़चं दोन-चार दिवस राहायचं आणि पुन्हा नवी उर्जा घेऊन परतायचं असं आपल्यापैकी 99 टक्के लोकं नक्की करत असतील...मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे गावी जाणं होत नाही उरतात त्या फक्त आठवणी,कधी जीव कासावीस होतो मग अशा सर्वांसाठी पुण्यात भरते ती भीमथडीची जत्रा...दर्दी पुणेकर या जत्रेची अगदी आतुरतेने वाट पाहात असतो...पारंपारीक संस्कृती,खाद्य,वाद्य अशा साऱ्यांचा संगम म्हणजे भीमथडीची जत्रा